Kunbi Certificate Special Report : इतर जातींमध्येही आढळल्या कुणबी नोंदी, मराठा आरक्षणासमोर नवा पेच?
Kunbi Certificate Special Report : इतर जातींमध्येही आढळल्या कुणबी नोंदी, मराठा आरक्षणासमोर नवा पेच?
मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची शेती करणारा तो कुणबी (Kunbi) ही मांडणी खरी असल्याचे जुन्या कागदपत्रांच्या नोंदीतून दिसून येत आहे. शेती करणारी जमता म्हणजे कुणबी अशी साधी व्याख्या या समाजाची आहे. मागील काही दिवसांपासून कुणबी मराठ्यांना आरक्षण (Reservation) देण्यासाठी पुरावे तपासले जातायत. कुणबी मराठा असलेलेल्या नोंदींच्या कागदपत्रांची शोधाशोध सध्या सुरु करण्यात आलीये. पण त्यातच आता लिंगायत, साळी, माळी, कोळी, मुस्लिम, धनगर, मारवाडी, यलम यांसारख्या अनेक जातींमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या जातीचे लोकही शेती करतात. पण या जातीतील लोकांना आरक्षण नाही. त्यामुळे कुणबी नोंदींच्या आधारे या जातीतील लोकांनी देखील आरक्षण मागितले तर काय हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.