दिग्दर्शक किरण नाकतींकडून वृद्धांना जेवण, औषध, मानसिक आधार,अनाथ वृद्धांचे अंत्यसंस्कार,दशक्रिया विधी
कोरोना काळात एकाकी आयुष्य जगणाऱ्या वृद्धांचे सर्वात जास्त हाल झाले आहेत. कोविड मुळे जर त्यांचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी आणि अस्थी विसर्जन करायला देखील कोणी नसतं. अनेकांचे नातेवाईक असूनही अनेक कोरोना बाबत गैरसमज असल्याने ते पुढे येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर स्मशान भूमीत अंत्यसंस्कार तर पालिका करते पण पुढे दशक्रिया विधी आणि अस्थी विसर्जन करायला कोणी नसल्याने त्या अस्थी तश्याच स्मशानभूमीत पडून राहतात. हे विदारक चित्र पाहून ठाण्यातील वी आर फॉर यु संस्थेचे संस्थापक आणि दिग्दर्शक किरण नाक्ती यांना राहवले नाही. त्यांनी अश्या अनाथ वृद्धांचे स्वतः अस्थी विसर्जन करण्याचे ठरवले आणि आता पर्यंत 15 व्यक्तीचे अस्थी विसर्जन आणि काहींचे दशक्रिया विधी त्यांनी केले आहेत.






















