Uddhav Thackeray KC Venugopal : ठाकरे दिल्लीत जाऊन गांधींना मुंबई भेटीचं निमंत्रण देणार?
Uddhav Thackeray Rahul Gandhi : देशभरात विरोधकांची एकजूट उभारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून (Congress) सुरू आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मतभेद असल्याचे समोर आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरून आघाडीत बिघाडी होणार असल्याचे संकेत दिसून येत होते. मात्र, तिन्ही पक्षांनी डॅमेज कंट्रोल सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. राहुल गांधी देखील 'मातोश्री'वर येणार का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आल्यानंतर वेणूगोपाल यांनी भूमिका स्पष्ट केली.





















