(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartiki Ekadashi 2021 Pandharpur : उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या हस्ते पडली शासकीय पूजा ABP Majha
Kartiki Ekadashi 2021 : आज कार्तिकी एकादशी... कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच पंढरपूर (Pandharpur) विठुरायाच्या नामघोषानं दुमदुमून निघालं आहे. विठुरायाच्या पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातले वारकरी कोंडीबा देवराम टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई हे दाम्पत्य यावेळी मानाचे वारकरी ठरले. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत, असं असलं तरी एसटीच्या संपाचं सावट या यात्रेवर आहे आणि नेहमी एसटीनं पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांची संपामुळे गैरसोय झाली आहे. तरीही मिळेल त्या वाहनानं वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पुन्हा एकदा गजबजलं आहे.
आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. तसेच कोंडीबा देवराम टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयाग बाई कोंडीबा टोणगे (वय 55) या नांदेड जिल्ह्यातील लोह तालुकामधील निळा या गावाच्या दाम्पत्याला मिळाला. मानाचे वारकरी कोंडीबा टोणगे आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई टोणगे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराला कार्तिकी एकादशी निमित्त 14 प्रकारच्या देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुलकर यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे.