Padalkar vs Awhad : पडळकर - आव्हाडांचा राडा कसा घडला? 'माझा'च्या कॅमेऱ्यात सगळं दिसलं ABP MAJHA
मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केल्याची माहिती आहे विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या या प्रकरणावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्याबाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. विधिमंडळाच्या लॉबीत जो प्रकार घडला त्याबाबत जितेंद्र आव्हाड, गोपीचंद पडळकर, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तर, राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवल्याची माहिती आहे. तर, गोपीचंद पडळकर यांनी या घटनेसंदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे.
विधिमंडळात काय घडलं?
विधिमंडळाचं अधिवेशन उद्या संपणार आहे, त्यापूर्वी आदल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी त्यांना काल झालेला वाद, त्यानंतर आलेल्या धमक्यांसंदर्भात माहिती दिली. यानंतर थोड्याच वेळात विधानभवनाच्या लॉबीत आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. जितेंद्र आव्हाड या घटनेंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात वाद झाला.






















