Jalna Adarsh Raut : रेखाचित्रातील दहशतवाद्याने हल्ल्याच्या आदल्या विचारलं... Pahalgam Terror Attack
Jalna Adarsh Raut : रेखाचित्रातील दहशतवाद्याने हल्ल्याच्या आदल्या विचारलं... Pahalgam Terror Attack
दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये ? जालन्याच्या पर्यटकाचा मोठा दावा... पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी बैसरन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी जालन्याच्या आदर्श राऊत यांच्याशी साधला संवाद तू काश्मिरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का? असा प्रश्न त्या संशयिताने आदर्श राऊतला विचारला. दहशदवादी आदल्या दिवशी आज भीड कम है अस एकमेकांशी बोलत होते - आदर्श राऊत आदर्शने एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेल संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवला... अँकर: पहलगाम हल्ल्याच्या एक दिवस आधी जालन्याच्या आदर्श राऊत या पर्यटकाशी बैसरन व्हॅलीमध्ये मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा दावा आदर्श राऊत यांनी केला आहे.तू काश्मिरी दिसत नाहीस, तू हिंदू आहेस का? असा प्रश्न त्या संशयिताने आदर्श राऊत यांना विचारला होता.तर आज भीड कम है अस दहशतवादी एकमेकांशी बोलत होते असदेखील आदर्श राऊत यांचं म्हणणं आहे.हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यानंतर, जालना येथील आदर्शने त्याच्याशी बोलणाऱ्या संशयिताची ओळख पटवली.संशयित दहशतवाद्याची ओळख पटवल्यानंतर, आदर्शने एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेल संभाषण आणि मॅगी स्टॉल चालकाचा नंबर देखील पाठवला आहे.दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवस आधीच पहलगाममध्ये असल्याचा दावा जालन्याच्या आदर्श राऊत यांनी केला आहे



















