(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोलीत पोलाद प्रकल्पासाठी तब्बल अडीचशे एकर जागा दिली : आत्राम
गडचिरोलीत पोलाद प्रकल्पासाठी तब्बल अडीचशे एकर जागा दिली : आत्राम
गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथे होणाऱ्या "सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड" या लोह पोलाद कारखान्यासाठी राज्याचे मंत्री व स्थानिक आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी तब्बल अडीचशे एकर जागा स्वतः दिल्याचा दावा केला आहे.. अडीचशे एकर जमीन दिल्याच्या ऐवज मध्ये कुठलाही मोबदला घेतलेला नाही आणि भविष्यात घेणारही नाही असा दावाही आत्राम यांनी केला आहे...
आज गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ गावात सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याचा भूमिपूजन पार पडणार आहे... राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या सह उद्योग मंत्री उदय सामंत या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोह खनिजांच्या खाणीतून निघणाऱ्या लोहखनिजावर आधारित हा कारखाना असणार आहे... या कारखान्यात टप्प्याटप्प्याने तब्बल 5 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून 7 हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा आहे...
स्वतःच्या मतदारसंघातील प्रकल्पासाठी अडीचशे एकर जागा दान म्हणून दिली आहे... जमिनीचा मोबदला मिळावा असा हेतू नसून या मागास जिल्ह्यात मोठे कारखाने यावे आणि लोकांना रोजगार मिळावे हा हेतू असल्याचे आत्राम म्हणाले...