(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravi Shastri on ISPL : गल्लीतलं टॅलेंट जगभर पोहोचणार, ISPL T-10 मुळे खेळाडू चमकणार
Ravi Shastri on ISPL : गल्लीतलं टॅलेंट जगभर पोहोचणार, ISPL T-10 मुळे खेळाडू चमकणार
१४० कोटीच्या आपल्या देशात ६०-७० कोटी तरी क्रिकेटर असतील.. म्हणजे कधी ना कधी कुठे ना कुठे क्रिकेट खेळलेले असतील.. सध्या कुठल्या न कुठल्या फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळत असतील.. कोणी लेदर बॉल तर कोणी टेनिस बॉलने क्रिकेट खेळत असेल.. ज्याला जसं शक्य होईल तशी आपली आवड जोपासताना दिसेल. आयपीएलमुळे देशाच्या छोट्या छोट्या भागात लेदरबॉलने खेळणाऱ्यांना मोठं दालन खुलं केलं. टेनिस बॉल क्रिकेट मात्र उपेक्षितच होतं. आज त्याच टेनिसबॉल क्रिकेटला ISPL-T10 स्पर्धेमुळे अच्छे दिन आले आहेत. देशातील मोठमोठे सेलिब्रिटी एकत्र येऊन या कामात आपला वाटा उचलत आहेत.
काय आहे. टेनिस बॉल क्रिकेटला रस्त्यावरुन उचलून थेट स्टेडियममध्ये पोहोचण्याची ही सुरुवात आहे. टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं बॅकिंग असलेल्या ISPL मुळे टेनिस बॉल क्रिकेटला लवकरच अच्छे दिन येतील आणि यात दडलेलं, उपेक्षित राहिलेलं टॅलेंट जगासमोर येईल अशी अपेक्षा केली जातेय.