FASTAG इतिहासजमा होणार? फास्टॅगऐवजी GPS System ने टोलचे पैसे बॅंकेतून वजा करणारी यंत्रणा उभारणार
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 10:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोल नाक्यावरच्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅग आणला.. मात्र आता फास्टॅगही इतिहासजमा करण्याची तयारी केंद्र सरकारनं सुरु केल्याचं कळतंय. फास्टॅगऐवजी जीपीएस यंत्रणेच्या मदतीनं थेट बँक अकाऊंटमधून टोलचे पैसे वसूल करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. परिवहन आणि पर्यटनसंदर्भातल्या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष टी जी व्यंकटेश यांनी बुधवारी संसदेत एक रिपोर्ट सादर केला आहे.