एक्स्प्लोर
Voter List Row: दुबार मतदारांवरून राजकारण तापलं, शेलार-देशपांडेंमध्ये जुंपली
राज्यातील दुबार मतदारांच्या (Duplicate Voters) मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 'राज ठाकरेंना केवळ हिंदू आणि भूमिपुत्रच हे दुबार मतदार दिसतायत का? तसंच त्यांना दुबार मतदार केवळ भोईर आणि पाटील हेच का दिसले?', असा सवाल शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, आशिष शेलार frustated (वैफल्यग्रस्त) झाले आहेत आणि केवळ चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. आम्ही सर्वच दुबार मतदारांवर आक्षेप घेत आहोत, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील शेलार यांच्या भूमिकेचे स्वागत करत, त्यांनी याच मुद्द्यावर मोर्चा काढावा, असे आव्हान दिले आहे.
महाराष्ट्र
Anup Jalota Majha Katta : अनुप जलोटा-पंकज उदास यांची गाण्यातून सेवा, कॅन्सर पेशंटला मदत
Anup Jalota Majha Maha Katta : 5 वर्ष थांबायला हवं होतं..अनुप जलोटांनी खंत बोलून दाखवली
Anup Jalota Majha Maha Katta : बिग बॉसमध्ये प्रतिमा मलिन झाली? अनुप जलोटा स्पष्ट बोलले
Nilesh Chandra Maha Katta : कबुतरांमुळे मराठी-मारवाडी वाद का? जैन मुनी निलेश चंद्र यांचा सवाल
Nilesh Chandra Maha Katta : ...तर आम्ही मराठी बोलणार नाही, जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























