एक्स्प्लोर
Three Language Formula: पहिलीपासून हिंदी सक्ती करण्यापेक्षा पाचवीपासून करावी - Dr. Narendra Jadhav
महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या चर्चेत, त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत महत्त्वाचे मत मांडले आहे. 'शालेय विद्यार्थ्यांना तिन्ही भाषा सक्तीच्या केल्या तर एक ना धड भारावर चिंध्या अशी अवस्था होईल,' असे थेट मत व्यक्त करत त्यांनी हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याऐवजी, सध्याप्रमाणेच पाचवीपासून हा विषय सुरू करावा, अशी शिफारस त्यांनी केली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात वेगवेगळे मतप्रवाह आहेत; काही जणांच्या मते हिंदीमुळे मराठीवर अतिक्रमण होत आहे, तर काहींच्या मते हिंदी भाषा लोप पावत आहे. या सर्व मतांचा आदर राखून समिती आपला अहवाल तयार करेल, असेही डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















