Devendra Fadnavis on Archana Patil : "लातूर जिल्ह्यात चांगलं नेतृत्व मिळालं, अर्चना पाटलांचं स्वागत"
Devendra Fadnavis on Archana Patil : "लातूर जिल्ह्यात चांगलं नेतृत्व मिळालं, अर्चना पाटलांचं स्वागत"
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर आणि राजेश नितुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झाला यावेळी बोलताना लातूरमध्ये मोठं नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकरांनी नेहमीच मूल्यावर आधारित राजकारण केलं आहे. त्यामुळे लातूरमध्ये भाजपला मोठं नेतृत्व मिळालं असून सुधाकरराव शिंगारे यांची जागा ताकतीने निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, त्यांनी अनेक समित्यांवर काम केलं असून येत्या काळामध्ये त्यांची वाटचाल मोठी असेल.























