Devendra Fadnavis Sabha at Anganwadi : 4 फेब्रुवारीला देवेंद्र फडणवीस यांची आंगणेवाडीत जाहीर सभा
कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा येत्या 4 फेब्रुवारीला होत आहे. या दिवशी भाजप राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहे. कारण आंगणेवाडीच्या यात्रेच्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आंगणेवाडीच्या जत्रेला येण्याची शक्यता आहे. आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता भाजप देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आंगणेवाडी जवळील भोगलेवाडी येथील माळरानावर घेण्याच्या तयारीत आहे. भाजपचे अनेक नेते या भव्य सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.



















