एक्स्प्लोर
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. 2014 साली निवडणूक शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी नागपूर कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली. त्यानंतर तक्रारदार अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं ऑक्टोबर 2019 मध्ये या प्रकरणावर प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती आज न्यायालयानं फेटाळून लावली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे लपवल्याचा आरोप अॅड. सतीश उके यांनी केला होता. मागील वर्षी कोर्टाने सतीन उके यांच्या याचिकेवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली होती.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















