Devendra Fadnavis on old Pension : जुन्या पेन्शनबद्दल आम्ही नकारात्मक नाही, मात्र... : फडणवीस
Devendra Fadnavis on old Pension : जुन्या पेन्शनबद्दल आम्ही नकारात्मक नाही, मात्र... : फडणवीस
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील कर्मचारी आंदोलनाच्या ड्युटीवर आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटना रस्त्यावर उतरल्यायत. मात्र त्यांच्या आंदोलनांना यश मिळेला का? असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत मांडलेली भूमिका. जुन्या पेन्शन योजनेसाठी कुणीही भावनिक होऊ नये, त्यांनी तांत्रिक बाबी समजून घ्यायला हव्यात. महाराष्ट्राची आर्थिक अवस्था भविष्यात सुदृढ राहायची असेल तर, याबाबत चर्चा करूनच निर्णय घ्यायला हवा, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलंय. त्याचसोबत ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलीय, तेसुद्धा २०३० सालापर्यंतच पैसे देतील, त्यानंतर त्यांनाही ते शक्य होणार नाही. अशी माहिती फडणवीस यांनी दिलीय. दरम्यान, सर्व संघटनांशी आम्ही चर्चेला तयार असून, त्यांनी सरकारची बाजू समजून घेतल्यास, हा विषय संपेल असंही फडणवीसांनी म्हटलंय.