Delhi Sanjay Raut PC : दिल्लीत ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठका; उद्धव ठाकरे काँग्रेससोबत चर्चा करणार
Delhi Sanjay Raut PC : दिल्लीत ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठका; उद्धव ठाकरे काँग्रेससोबत चर्चा करणार
खरा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे, असे वक्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा चालवला पाहिजे. जर त्यांना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. रामदास आठवले यांचाही पक्ष आहे. काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात, अशी टिप्पणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आज दिल्लीत दाखल होती. पुढील दोन दिवसांत ते काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेतील.