Same Uniforms for all School : राज्यभरातील शाळांमध्ये एकच गणवेश, दीपक केसरकरांनी दिली माहीती
राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. 'एक राज्य एक गणवेश' योजना राज्यात राबवण्याचा हा निर्णय आहे. आणि याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी यापुढे एकाच गणवेशात दिसतील, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय. पण शाळा सुरू व्हायला आता जेमतेम तीन आठवडे उरलेत. त्यामुळे बहुतांश शाळांनी त्यांच्या गणवेशासाठी ऑर्डर दिल्या आहेत. त्या शाळांना यातून सूट देण्याचा निर्णय होतोय. म्हणजे पहिले तीन दिवस विद्यार्थी शाळांचा गणवेश घालतील आणि उर्वरित तीन दिवस एक राज्य एक गणवेश योजनेतील गणवेश परिधान करतील. या निर्णयामुळे राज्यातील ६४ लाख २८ हजार विद्यार्थी यापुढे एका गणवेशात दिसतील.






















