Narayan Rane Vs Shiv Sena : Sindhudurgमध्ये जमावबंदी, राणे मात्र Jan Ashirwad Yatra काढण्यावर ठाम
नारायण राणेंच्या अटक प्रकरणानंतर सिंधुदुर्गमध्ये ७ तारखेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलीय...तरीही दुसरीकडे उद्यापासून जनआशीर्वाद यात्रा सुरु करणार असल्याचं राणेंनी ठणकावून सांगितलंय. त्यामुळं राणे आणि शिवसेनेतला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.... काल मुंबईतल्या पत्रकार परिषदेतही राणेंनी शिवसेनेवर पुन्हा टीका केली...आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला...योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी राणेंनी केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरेंविरोधात आता भाजपच्य़ा गोटात हालचाली सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीए.






















