एक्स्प्लोर

Coronavirus | नांदेडमध्ये कोविड रुग्णालयं फुल्ल; ऑक्सिजन साठाही संपला, उपचारांसाठी रुग्णांची वणवण

नांदेड : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच शहरांसोबतच अनेक जिल्ह्यांमध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयं कोरोना रुग्णांनी फुल्ल झाली आहेत. तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन काही तासांत संपणार असल्याची धक्कादायक माहिती डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एस. चव्हाण यांनी एबीपी माझाला फोन वरून दिली आहे. शासकीय मेडिकल कॉलेज येथे रुग्णांना अक्षरशः परत पाठवलं जात आहे. 

संपूर्ण जिल्ह्यातून शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण नांदेड येथील डॉ. शंकराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात. परंतु कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे येथे बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना परत पाठवलं जात आहे. काल (शनिवारी) 6 एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री अशोक चव्हाण यांनी 200 बेडच्या जम्बो कोविड सेंटरला मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. पण आज ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं विदारक सत्य समोर येत आहे. तर बेड अभावी रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय. 

या रुग्णालयातील परिस्थिती विषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनीही यावर काहीही उत्तर देणं टाळलं आहे.  तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचं काम अन्न आणि औषध प्रशासनाचे आहे, पण आज जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन अपुरा पडतो आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होतात, या सर्व प्रकाराला जबाबदार आणणाऱ्यावर कारवाही होणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

आज नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नांदेड शहरातील कोरोना बाधित तरुणी बेडसाठी कुटुंबासह वणवण भटकत होती. समर्थ नगर येथील श्रावणी मामीडवारच्या घरातील सर्वच सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज श्रावणी स्वतः बाधित असून ती आपल्या आजोबांना रुग्णालयात घेऊन आली. पण या ठिकाणी बेड उपलब्ध नसल्यानं शहरातील दुसऱ्या रुग्णालयात बेड मिळतो का याचा शोध ती घेत आहे. श्रावणीने यावेळी देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सामान्य लोकांना बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध करून द्या आणि जगण्यासाठी मदत करा, अशी हाक दिली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget