(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zeeshan Siddique : काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजितदादांच्या मंचावर! ABP Majha
Zeeshan Siddique : काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजितदादांच्या मंचावर!
हे देखील वाचा
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून
नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून पुणे, नाशिकसह मराठावाडा आणि विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने शहराला झोडपून काढल्याचं पाहायला मिळालं. शहरातील रस्त्यांना आले नद्यांचे रूप आल्याचं दिसून आलं. यावेळी, रस्त्यावरुन पाणी वाहत होतं, त्यातूनच नागरिकांना मार्ग काढवा लागला. तसेच, शहरातील उड्डाणपूल आणि पुलाखाली जाणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी साचलं होतं. त्यामुळे, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिकसह पुणे शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून हडपसर भागात पावसामुळे पाणीच पाणी झाल्याची परिस्थती निर्माण झाली. विशेष म्हणजे कालही पुण्यात पावसाची मुसळधार सरी कोसळल्या होत्या.