CM on Rahul Bajaj: देशाभिमानी उद्योजक गमावला- मुख्यमंत्री ठाकरे ABP Majha
ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे... गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
