(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ekanth Shinde Vitthal Mahapuja : एकनाथ शिंदेंच्याहस्ते शासकीय विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न
आज आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची (Pandharpur) नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा (Shri Vitthal Rukmini Mahapuja) संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु या युक्तीप्रमाणे वारकऱ्यांसाठी आज महत्वाचा दिवस आहे. कारण आज आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे. दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्याची अतुरतेने वाट पाहत असतात. आज चंद्रभागेच्या तिरावर वारकऱ्यांचा सोहळा भरला आहे. वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन आहेत.