एक्स्प्लोर
Solapur Flood | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दारफळ येथे मुख्यमंत्र्यांकडून अतिवृष्टीची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ तालुक्यातील निमगाव आणि दारफड तसेच सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील दारफड येथे अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्तांशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूरमध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांना फटका बसला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहणी करून बाधित लोकांना धीर दिला. त्यांनी सांगितले की, "या सर्वच गोष्टींचे पंचनामे करून शासन या सर्व बाधित लोकांच्या मागं खंबीरपणे उभे राहील. त्यांना तातडीची मदतही दिली जाईल आणि जे काही नुकसान झाले त्याला जास्तीत जास्त भरपाई देण्याचा प्रयत्न राज्य सरकार केलंय." सोलापूरमध्ये अडकलेल्या २२ लोकांना इंडिया रेडक्रॉसच्या टीमने सुरक्षित बाहेर काढले, तर यापूर्वी १० लोकांना हेलिकॉप्टरने वाचवण्यात आले होते. वाकाव आणि राहुल नगर या गावांमध्ये अजूनही काही लोक अडकलेले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. मदतकार्यात रस्त्यांच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















