Chiplun Rain :रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चिपळूणातल्या वाशष्ठि नदीच्या पाणीपातळीत वाढ
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसत असल्याचे चित्र आहे. सोमवार अर्थात काल दुपारनंतर सुरु झालेला पाऊस सध्या जोरदार बॅटिंग करताना दिसतोय. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये नऊ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केले असून मच्छीमारांनी समुद्रात न जाण्यास सूचना केल्या आहेत. सध्या मंडणगड, दापोली, गुहागर, चिपळून, लांजा, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यांमधील सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस बरसत आहे. पण सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या



















