Sambhajinagar Boy Kidnapping : घरापासून 100 मिटीर अंतरावरुन नामांकित बिल्डरच्या मुलाचं अपहरण
Sambhajinagar Boy Kidnapping : घरापासून 100 मिटीर अंतरावरुन नामांकित बिल्डरच्या मुलाचं अपहरण
शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी काल रात्री अपहरण करण्यात आले. घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील सेंट्रल मॉल येथून अपहरण झाले. जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. वडील पुढे चालत असताना मुलगा सायकलवर मागे होता. काळ्या रंगाची चारचाकी आली अन् मुलाला वडिलांसमोर उचलून नेले. ही घटना मंगळवारी रात्री 8.40 वाजता सिडको एन-4 मध्ये घडली
हे ही वाचा...
Anjali Damania:मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh)यांच्या हत्येला 50 दिवस उलटले असून या प्रकरणात एक आरोपी अजूनही फरार आहे . धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांचा राज्य सरकारने चार दिवसात राजीनामा घेतला नाही तर कोर्टात दाद मागणार असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया(Anjali Damania)यांनी उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांना 96 तासांचा अल्टिमेटम दिलाय.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील दंडेलशाहीविरोधात आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी (27 जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली होती . वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे आर्थिक संबंधात गुंतलेले असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे .धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्र अजित पवारांसमोर ठेवत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही त्यांनी केली होती . आता त्यांनी चार दिवसात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर थेट कोर्टात धाव घेणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना अल्टिमेटम दिलाय .





















