Chhagan Bhujbal : लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्यानं 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते : भुजबळ
Chhagan Bhujbal : लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्यानं 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते : भुजबळ
नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं हा गुन्हा आहे. त्याला एक महिना शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सरकारला देण्यात आलेल्या इशाऱ्यावर देखील भुजबळांनी टीका केली आहे. या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे? सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहे वाट पाहा, असा सल्ला देखील जरांगेंनी दिला आहे. मी अनेक मोठे मोठे लोकं अंगावर घेतले आहे. तू किस झाड की पत्ती आहे, असे म्हणत जरांगेच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

















