Chandrashekhar Bawankule : Sudhakar Badgujar यांच्यासाठी भाजपचं दार खुलं, बावनकुळेंचं मोठं विधान
Chandrashekhar Bawankule : Sudhakar Badgujar यांच्यासाठी भाजपचं दार खुलं, बावनकुळेंचं मोठं विधान
ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्ते पक्षात नाराज असल्याचा दावा केला. यामुळे नाशिकच्या (Nashik News) राजकारणात मोठी खळबळ उडाली. यानंतर बुधवारी ठाकरे गटाकडून बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्याच दिवशी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा फोन आला आणि त्या फोनवरूनच पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली, अशी घोषणा करण्यात आली. यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.




















