Chandrashekhar Bawankule File Nomination : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज शक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज
Chandrashekhar Bawankule File Nomination : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज शक्तिप्रदर्शन करत भरणार अर्ज
भाजप नेते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संगमनेर आणि कोपरगावमध्ये वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. तसेच या घटनेचा विरोध केला होता. मात्र आचारसंहिता असल्यामुळे जयश्री थोरात यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, संगमनेरमध्ये झालेल्या घटनेची दखल केंद्र सरकारने घेतली म्हणे. पण त्या वाचाळ देशमुखवर अशा कारवाईसाठी बावनकुळे यांना दिल्लीच्या बादशाहची परवानगी लागणार आहे? असा निशाणा दानवेंनी साधला.
काय म्हणाले होते वसंत देशमुख ?
संगमनेरमधील राजकीय पार्श्वभूमीवर, आमदारकीच्या उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या संकल्प मेळाव्यात जयश्री थोरातांना उत्तर देताना भाजप नेते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि थोरात कुटुंबावर टीका केली. त्यासोबतच त्यांनी जयश्री थोरातांना लक्ष्य करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर धांदरफळमधील त्या सभेत मोठा गोंधळ झाला होता. वसंत देशमुख यांच्या विधानानंतर काँग्रेसच्या स्थानिक महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. या महिला कार्यकर्त्या थेट स्टेजवर चढल्या आणि त्यांनी ठिय्या माडंत वसंत देशमुखांकडून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह्य विधानाबाबत माफीची मागणी केली.