एक्स्प्लोर
Kolhapur | पावनगडावर सापडला शिवकालीन ठेवा
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळगडाच्या अगदी बाजूलाच असलेल्या पावनगडावर शिवकालीन शेकडो तोफगोळे सापडले आहेत. संपूर्ण देशभरातील पर्यटक पन्हाळागडावर येतात. मात्र त्याच बाजूला असलेल्या पावनगडाबाबतीत खूप कमी पर्यटकांना माहिती आहे. हा गड स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला आहे. याच गडावर टीम पावनगड दिशादर्शक आणि माहिती देणारे फलक लावत होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यासंदर्भातले काम सुरू होतं. आज सकाळी महादेव मंदिराच्या समोर दिशादर्शक फलक लावत असताना तोफेचे गोले सापडले. आणखी काही खोदल्यानंतर हजारो गोळी याठिकाणी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या टीम पावनगड यांनी काढलेले तोफगोळे 406 इतके झाले आहेत. महाराष्ट्रात एखाद्या किल्ल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात तोफगोळे मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे या ठिकाणी उत्खनन होऊन शेकडो वर्षे मातीखाली लपलेला ऐतिहासिक ठेवा जगासमोर आणण्याची गरज आहे.
महाराष्ट्र
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP : काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
आणखी पाहा






















