Nitesh Rane यांना दिलासा, अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही ABP Majha
नितेश राणेंच्या जामीन अर्जासंदर्भातील बातमी... पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या शुक्रवारपर्यंत नितेश राणे यांना अटकेपासून दिलासा मिळालाय. पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंना अटक न करण्याची ग्वाही राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिलेय. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयानं फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आज यावर सुनावणी झाली. त्यावेळी या हल्ल्यासाठी नितेश राणेच जबाबदार असल्यचा दावा राज्य सरकारनं केला. आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी कोर्टाकडे मुदत मागितली आहे. या प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे


















