Bharat Gogawale : Sunil Tatkare यांचा समाचार घ्यायला मी कधीही तयार पण...गोगावले काय म्हणाले?
Bharat Gogawale : Sunil Tatkare यांचा समाचार घ्यायला मी कधीही तयार पण...गोगावले काय म्हणाले?
महाड येथील चांदे क्रीडांगणावर काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंत्री भरत गोगावले (Bharat Bhogawale) यांच्या नॅपकिनची नक्कल केली होती. यावरुन मंत्री गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या या नकलीचा चांगला समाचार घेतलाय. भरतशेठ यांच्या नॅपकिनची नक्कल सगळ्यांनाच करता येत नाही. सुनील तटकरे यांना नॅपकिनसाठी पाऊस उघडल्यावर आम्ही एखादा कार्यक्रम लावू. शिवाय नॅपकिन आम्ही खांद्यावर वेटर सारखी घेत नाही तर काखेत घेतो. त्यामुळे माझ्या नॅपकिनमध्ये गोरगरिब जनतेचे आशीर्वाद आहेत असे म्हणत त्यांनी तटकरेंवर चांगलाच निशाणा साधला.
लोकसभेला सुनील तटकरे यांना मुस्लिम मतांचा फटका बसल्याचे गोगावले म्हणाले. शिवाय 400 पार चा देण्यात आलेला नारा याचा देखील या मतांना मोठा फटका बसला आहे. आमदारकी आणि खासदारकीला वेगळी गणित असतात. त्यामुळं त्यांनी हे गणित स्वतः तपासून घेतले पाहिजे. अदिती तटकरे यांना मुस्लिम बहुमोल असलेल्या श्रीवर्धन मतदार संघात 80 हजारांची लीड मिळते तिथेच खासदारकीला सुनील तटकरे यांना 30 हजाराचे फक्त लीड मिळत असेल तर याचे उत्तर त्यांनी शोधावं असा सल्ला तटकरेंना गोगावले यांनी दिला आहे.



















