Bhandara Lakhandur Anglo Hospital : रुग्णालयात ना डॉक्टर, ना कोणता आरोग्य कर्मचारी, इमारतही धूळखात
नागरिकांच्या सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी शासनाच्यावतीने ठिक-ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा रुगाणालय, ग्रामीण रुग्णालय तर कुठे अँग्रो रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यसेवा देण्यात येतात. मात्र भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील पारडी या गावात लाखो रुपये खर्चुन अँग्रो रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली, काही दिवस डॉक्टरांनी या रु्णालयात हजेरी लावून नागरिकांना आरोग्य सुविधा दिल्या. दरम्यान आता वर्ष उलटून गेलं तरीही येथे कोणतेही आरोग्य कर्मचारी उपस्थित नाहीत. नाना पटोले यांच्या विधानसभा मतदार संघातील पारडीमधील रुग्णालय वर्षभरापासून कुलुपबंद आहे. यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी 10 किमीपर्यंत पायपीट करावी लागतीय.























