एक्स्प्लोर

Badlapur School : बदलापुरात चिमुकलींवर अत्याचार; पालक संतापले; थेट शाळाच फोडली

Badlapur School : बदलापुरात चिमुकलींवर अत्याचार; पालक संतापले; थेट शाळाच फोडली
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून स्थानिक पोलीस आणि शाळा प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात असतानाच आता शाळेने माफीनामा जाहीर केला आहे. याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले आहे.  मंगळवारी सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना हा खटला फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली आहे. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तर यात हलगर्जीपणा करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.  सबंधित संस्थेने जाहीर केलेल्या माफिनाम्यात या प्रकाराला तो दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय म्हटले आहे. या प्रकारानंतर सबंधित आरोपी विरुद्ध कारवाई करण्यासाठी पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना सहकार्य केले. या घटनेनंतर सबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे, असे शाळेने निवेदनात म्हटले आहे. आरोपीची हकालपट्टी करण्यात आली असून ज्या खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने संस्थेच्या सेवेत आला होता. त्या कंत्राटदार कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्याचा करार रद्द केला आहे. तसेच हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आल्याचेही संस्थेने सांगितले आहे. तसेच त्या वर्गाच्या वर्गशिक्षका, मुलांची ने आण सुरक्षितरित्या करण्याची जबाबदारी असणाऱ्या सेविका यांनाही सेवेमधून कमी करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक आणि शिशु वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या आणि सांभाळ करण्याच्या दृष्टीने फक्त महिलांचीच नेमणूक केली जाणार आहे. या प्रकरणात पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेने त्यांची जाहीर माफी मागितली असून त्यांना कायदेशीर मदत देऊ केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व पालक, विद्यार्थी आणि शहरातील सजग नागरिकांना संस्थेने शांततेचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी संस्था तयार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी सांगितले आहे.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band: 'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
'देऊळ बंद 2'ची संपूर्ण टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, देवेंद्र फडणवीस सिनेमावर भरभरुन बोलले, कलाकारांवर कौतुकाची थाप
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
NCP Rajya Sabha Seat : प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची खलबतं; भुजबळांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा? ठाकरेंच्या माजी खासदाराचेही प्रयत्न; नावांवरून चर्चा, कोणाची लागणार वर्णी
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची खलबतं; भुजबळांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा? ठाकरेंच्या माजी खासदाराचेही प्रयत्न; नावांवरून चर्चा, कोणाची लागणार वर्णी
Sanjay Raut : कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Embed widget