Sharad Pawar Atul Benke : दादांचा आमदार पवारांसोबत, एकत्र प्रवास आणि जेवण, चर्चांना उधाण
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांना अनेक तरुण आणि धडाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याने पक्षाची मोट बांधण्यासाठी आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. शरद पवार आज जुन्नरमध्ये होते. त्यावेळी अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांचं जुन्नरमध्ये स्वागत केल.. तर स्वागतानंतर आमदार अतुल बेनके यांना शरद पवारांनी गाडीत बसण्याचा इशारा केला आणि अतुल बेनकेही गाडीत बसून शरद पवारांसोबत गेले..एवढंच नाही तर शरद पवार अतुल बेनकेंच्या घरीदेखील गेले.. हे सगळं चित्र पाहून एकच चर्चा रंगू लागली..एकीकडे ६ ऑक्टोबरला राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी असताना दुसरीकडे अजित पवार गटाच्या आमदाराचा शरद पवारांसोबत एकत्र प्रवास संभ्रम निर्माण करणारा..





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
