पवारांच्या घरावर हल्ल्या, राष्ट्रवादी आमदार Dilp Mohite Patil वक्तव्य मातोश्रीवर हल्ला करायचा होता
प्रश्न राज्याचा होता, त्यामुळे हल्ला करायचा होता तर मातोश्रीवर करायचा होता. असं वक्तव्य पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केलाय. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घराऐवजी मातोश्रीवर हल्ला करायचा होता, मग तुम्हाला या हल्ल्याची किंमत कळाली असती. असं आमदार मोहितेंनी वक्तव्य केलंय. खेड-आळंदी या त्यांच्या मतदार संघात कालच्या हल्ल्याचा निषेध करताना ते बोलत होते. परिवहन मंत्री पद ही शिवसेनेच्या अनिल परबांकडे आहे. त्यामुळे या विषयाशी पवार साहेबांचा दुरान्वये संबंध नाही. तरीही काही शक्तींनी कालच कृत्य केलं. राज्यातील महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचा सर्वात मोठा वाटा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला अस्थिर करण्यामागे या शक्ती लागलेल्या आहेत. असं ही मोहितेंनी पुढे नमूद केलं.





















