Ashish Pawar Power Lifting:जिद्दीसमोर दुर्धर आजार हरला,जागतिक स्तरावर पठ्ठ्यानं झळकावलं भारताचं नाव
Continues below advertisement
आपल्यापैकी प्रत्येकालाच अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणींवर मात करत आयुष्यात नवी उंची गाठणाऱ्या व्यक्ती यशस्वी होतात आणि कित्येकांच्या प्रेरणा देखील बनतात.क्रोहन सारख्या दुर्मीळ आजारावर सात वर्षानंतर मात करत ४३ वर्षांचा जीम ट्रेनर आशिष पवार... हाच आशिष पवार आता १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान वर्ल्ड युनायटेड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तो प्रतिनिधीत्व करणारेय. पवार यांना 2012 मध्ये क्रोहनसारख्या आजारानं ग्रासलं होतं. गेले सात वर्षं या आजाराशी ते झुंज देत होते. जिम ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या आशिषला काहीतरी नवीन शिकायची आवड होती. म्हणून त्यानं पॉवर लिफ्टिंग शिकण्यास सुरुवात केली.आणि आज त्यांच्या या मेहनतीचं फळ अखेर त्यांना मिळालंय.
Continues below advertisement