Zero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्रेकनंतर झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत.. ज्यांच्या समर्थनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी काल सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.. त्या राहुल गांधींसंदर्भातली बातमी.. काल भाजपवर आरोप करत असताना राहुल गांधींनी जी जोरदार बॅटिंग केली.. त्यातीलच वक्तव्य हाताशी धरत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोक सभेत राहुल गांधींना क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावासाठी लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं.. आणि मोदींनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरींचा उल्लेख केला.. सोबतच राहुल गांधींच्या कालच्या भाषणाला उत्तरं दिलं..राहुल गांधींच्या वक्तव्याचा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध व्यक्त केला होता.. आज सकाळपासूनचं भाजपनं देशभरात निदर्शनं केली.. टीका केली.. फक्त भाजपच नाही तर आज मित्रपक्षांकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध बघायला मिळाला. भाजपाच्या मित्रपक्षांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजप मित्रपक्षांमध्ये कशी एकवाक्यता दिसली..
केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही राहुल गांधींवर पलटवार केलाय.. तो आधी पाहुयात..
आज म्हणायला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान बोलणार असे जरी असले, तरी उत्सुकता होती... ती राहुल गांधींना मोदी काय उत्तर देणार ह्याची... त्यांच्या भाषणाचा एक मोठा भाग राहुल गांधींवर असणार.. ही अपेक्षा होती. आणि मोदींनी अपेक्षाभंग केला नाही.. १० वर्षानंतर देशाला विरोधी पक्ष नेता मिळाला आणि काल ते पद भूषवणाऱ्या राहुल गांधींचे पहिलेच भाषण होते... त्यात त्यांचा रोख निवडणुकीसारखाच मोदी सरकार विरोधी होता... त्यालाच आज त्याच आवेशात पंतप्रधानांनी उत्तर दिले... मोदी भाषणाला उभे राहिले तेव्हापासूनच विरोधी बाकांवरून गोंधळ ऐकू येऊ लागला... मात्र मोदींनी हि न थांबता आपले भाषण सुरु ठेवले.. आणि राहुल गांधींनी काल केलेल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढलं.. आणि राहुल गांधी यांच्या हिंदू या शब्दावरुन केलेल्या टीकेला विशेष उत्तर दिलं.. पाहुयात..
नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं.. पण, जसं भाजपच्या मित्रपक्षांनी देशभरात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.. अनेक ठिकाणी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली.. बॅनरबाजी केली.. तिथं काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही राहुल गांधीचं समर्थन सुरु केलंय.. आणि त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातून.. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं वक्तव्य केलं.. तर राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवल्याची टीका, संजय राऊतांनी केली.. पाहुयात..