Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाब

नवी दिल्ली : काही लोकांनी निवडणुकीच्या वेळी सर्व मार्गांचा अवलंब केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही, काही लोकांच्या वेदना मी समजू शकतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांना टोला लगावला. खोटं पसरवूनही विरोधकांचा पराभव झाल्याचं ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात देशातील 25 कोटी जनता गरिबीच्या बाहेर आली असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरूवात करताच लोकसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सभासदांना समज दिली. 

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा खासदार झालेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केलं. तसेच जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola