Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनमस्कार मी सरिता कौशिक, झीरो अवरमध्ये आपलं स्वागत... संसदेच्या विरोधी पक्षनेत्यानं एक वक्तव्य केलं... आणि त्यावरुन आक्रमक झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालंय.. हि राज्यासाठी मोठी बातमी आहे कारण आजवर राज्यात ह्या आधी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याचे कधीही निलंबन झालेले नाही ... पण ते आज ५ दिवसासाठी झाले आहे ....
त्याचं झालं असं की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजपला टार्गेट करत असताना हिंदूंवरुन एक वक्तव्य केलं आणि भाजपनं त्या वक्तव्याचा आधार घेत देशभरात निदर्शनं केली.. इतकंच नाही तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले.. कालच विधान परिषदेत.. राहुल गांधींच्या 'हिंदू'बाबतच्या वक्तव्यावरून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता.. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी.. भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळदेखील केली.. तसंच अंगावरही धावून गेले... त्यानंतर आज आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांनी, दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करत विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.. तसंच कारवाई करण्याची मागणी केली.. यानंतर विधान परिषदेत भाजप आमदार चंद्रकांत पाटलांंनी, अंबादास दानवेंवर निलंबनाच्या कारवाईसंदर्भात प्रस्ताव मांडला... यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंंनी अंबादास दानवेंंचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं...आज अगदी काही वेळात हि निलंबनाची कारवाई करणाऱ्या डॉक्टर नीलम गोर्हे झीरो अवर मध्ये आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेतच ... आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या देतीलच ... मात्र त्याआधी सभागृहात नेमकं काय घडलं ते पाहुयात..
राज्यात सध्या निवडणुकांचा ज्वर तापतोय.. लोकसभेच्या निकालांनंतर तर सर्वच पक्षांचा, नेत्यांचा सूर बदललाय.. त्यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर.. महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांचीही दबक्या आवाजात कुजबूज ऐकू येतेय.. त्यातच २०१९पासून एकमेकांना पाण्यात पाहणारे ठाकरे आणि भाजपमध्ये.. विशेषत: देवेंद्र फडणवीसांसोबत पुसटसा संवादही सुरू झालाय.. २७ जून रोजी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी, एकत्रित लिफ्टने प्रवास केला होता.. त्या भेटीने राजकीय वर्तुळात धुरळा उडालेला असतानाच.. आज विधानभवनच्या लॉबीमध्ये अचानक आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आले.. यावेळी दोघांमध्ये हास्यविनोदही झाला.. या भेटीवेळी अंबादास दानवेसुद्धा उपस्थित होते.. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत दोन ठाकरेंशी फडणवीसांशी झालेल्या अचानक भेटीच्या, योगायोगाची चांगलीच चर्चा झडतेय...