भाजपला थोडी तरी लाज असले तर राजीनामे देतील, दिल्लीत आणि महाराष्ट्रात पडसाद दिसतील : Arvind Sawant
बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांसह शिवेसना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत आहेत. या आंदोलनावेळी काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर मुंबईत ठिकठिकाणी शिवसेना रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. तसेच या घटनेबाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेणार आहे.























