Maruti Chitampalli Passed away : अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचं निधन, 93 व्या वर्षी अखरेचा श्वास
Aranya Rishi Maruti Chitampalli Passes Away News : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 वर्षी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यावेळी दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती, ते आजारी आणि अंथरुणातचं होते. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले
कोण आहेत मारुती चित्तमपल्ली?
मारुती चित्तमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली आहे. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती. 5 लाख किमी प्रवास. 13 भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती. त्या माहितीची नोंद केलेल्या व 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.





















