(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, सचिन वाझेंची माफीचा साक्षीदार होण्याची तयारी
मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.. आणि त्यामागचं कारण आहे याच प्रकरणातील दुसरे आरोपी, अर्थात सचिन वाझेंनी ईडीकडे केलेला अर्ज... सचिन वाझेंनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवलीय. या प्रकरणी ज्ञात असलेली सगळी माहिती न्यायालयासमोर सांगण्यास तयार असल्याचं सचिन वाझेंनी ईडीच्या सहाय्यक संचालकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.. त्यामुळं आता सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्याची परवानगी मिळणार का? आणि परवानगी मिळाली तर सचिन वाझेंची साक्ष अनिल देशमुखांन अडचणीत आणणार का असे प्रश्न आता उपस्थित केले जाताहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनंतर हे प्रकरण १०० कोटींच्या वसुलींच्या आरोपांवर येऊन पोहोचलं. सचिन वाझेंना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलंय. तर अनिल देशमुखांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय..