Amravati Navneet Rana :राणा दाम्पत्य पहाटेपासून नजरकैदेत,राजपेठ पुलावरील शिवरायांचा पुतळा हटवला
महापालिकेच्या परवानगीशिवाय राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आलाय. पोलिसांच्या मदतीनं महापालिकेनं हा पुतळा हटवलाय.. कारवाईसाठी काल रात्रीच पोलीस आणि महापालिकेचं पथक राजापेठ उड्डाणपुलावर दाखल झालं होतं. पुतळा बसवणारे आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांना पहाटेपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे काल रातोरात दर्यापूरमध्ये शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय.. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुतळा बसवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
