Amol Kolhe Vs Ajit Pawar : 'कुणीतरी म्हणालं काकाच का?', कवितेतून पलटवार, आव्हाडही बरसले
Amol Kolhe Vs Ajit Pawar : 'कुणीतरी म्हणालं काकाच का?', कवितेतून पलटवार, आव्हाडही बरसले
कोणीतरी म्हणालं काका का? जनता म्हणाली अजूनही काकाच का? पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं तरीही अजूनही काका का? बोलता धनी बोलवता धनी पुरेपूर जाणतो. काका का? पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का? कारण काका फक्त माणूस नसतो. काका फक्त नेता नसतो. 50 वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून वाहणारा विचार असतो. काटेवाडीच्या का पासून कारगिलच्या का पर्यंत काकाच असतो.
"मला अनेकजण विचारतात हा निर्णय तुम्ही का घेतला? हा निर्णय घेताना माझ्या समोर होती ती राज्यांतील माय माउली होती कारण ती माय माउली आपल्या लेकराला सांगते चटणी भाकरी खा मात्र तत्वाने जग. कोणतीही माय माउली सांगत नाही की चोरी चपाटी कर आणि श्रीमंत हो...
काका का हा प्रश्न राज्यांत सातत्यानं येत आहे...
कुणीतरी म्हणाल काका काका...
जनता म्हणाली अजुनही काकाच का?
पक्ष मिळाला चिन्ह मिळालं तरी देखील काकाच का?"
काका फक्त माणूस नसतो काका फक्त नेता नसतो. 50 वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून वाहणारा विचार असतो
काटेवाडीच्या का पासून कारगिल च्या का पर्यंत काकाच असतो
शेताच्या बांधावर काका असतो विचारांच्या बैठकीत काका असतो उद्योग धांदाच्या बैठकीत काकच असतो... म्हणुन गल्ली पासुन दिल्ली पर्यंत काकाचं हवा असतो."






















