Amol Kirtikar : वायकरांच्या मेहुण्याने वापरला EVM अनलॉक करणारा फोन? प्रकरण नेमकं काय?
Amol Kirtikar : वायकरांच्या मेहुण्याने वापरला EVM अनलॉक करणारा फोन? प्रकरण नेमकं काय?
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय... आता तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आलंय.. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.
वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या
ऑपरेटरवर गुन्हा दाखल, लवकरच अटक वॉरंट जारी होणार
Amol Kirtikar vs Ravindra Waikar, Mumbai North West Loksabha : रवींद्र वायकर आणि आमोल किर्तीकर यांची महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक अटीतटीची लढत झाली. अटीतटीच्या लढाईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला होता. सुरुवातीला अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र, फेरमतमोजणीत पोस्टल मतं निर्णायक ठरल्याने रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी निसटता विजय मिळवला होता. आता या प्रकरणातील एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर निवडून आले असले तरी मतमोजणीबाबत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.आता तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आलंय. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.