Ajt Pawar Baramati Voting : छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक,पत्नी, आईसह अजित पवारांकडून मतदान
Ajit Pawar Baramati Voting : छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक,पत्नी, आईसह अजित पवारांकडून मतदान
सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, आता राजकीय पक्ष कामाला लागले असून दिवाळीपूर्वीच राज्यात धमाका होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी देखील नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली. पहलगाम येथे आपल्या देशातील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे ही मागणी होती. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते काम केले, पाकिस्तानला (Pakistan) चोख उत्तर दिले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्या सैन्याने चोख उत्तर देत जगाला भारताची ताकद दाखवून दिली, त्यांना मी सॅल्युट करतो, असे अजित पवारांनी नाशिक येथील सभेत बोलताना म्हटले.तुम्ही मजबुतीने सरकारच्या मागे उभं राहिले पाहिजे, असेही अजित पवारांनी म्हटले. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.






















