एक्स्प्लोर
Maharashtra Olympic Association ऑलिम्पिक असोसिएशनवर अजितदादांचेच वर्चस्व, बिनविरोध निवड;अधिकृत घोषणा
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बिनविरोध निवड झाली आहे. 'एकीकडे राजकारणामध्ये हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उतरताना, दुसरीकडे खेळाच्या मैदानात देखील तसेच चित्र निर्माण होते की काय,' अशी स्थिती निर्माण झाली होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती, मात्र त्यांनी अर्ज मागे घेतल्याने पवार यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी निवडण्याचा मार्ग मोकळा झाला. आता मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे खेळाच्या मैदानावरील राजकीय संघर्ष टळला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















