(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Pune : पुण्यातील पूरस्थितीचा पालकमंत्र्यांकडून A to Z आढावा; काय उपाययोजना करणार?
अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुसळदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या ३२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस (Pune Rain) झाला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी माहिती देताना म्हणाले, गेल्या ३२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच पुण्यात आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये झालेला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) पुण्यात झाला आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळला आहे. शहर परिसरातील सर्व धरणे जवळपास भरली आहेत. पावसाचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी झाल्याचं दिसून येत आहे. चालकांनी व्यवस्थित वाहने चालवा, आवश्क नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, काळजी घ्या असंही त्यांनी म्हटलं आहे.