Ahmednagar hospital fire : डॉ. विशाखा शिंदे यांच्या समर्थनासाठी मोहीम ABP Majha
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीच्या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे यांच्या अटकेविरोधात नेटिझन्सनी मोहीम उघडली आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर विशाखा शिंदे कायमस्वरुपी कर्मचारी नसताना त्यांना जबाबदार धरून कारवाई केल्याचा निषेध सोशल मीडियातून केला जातोय. या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकासह एक वैद्यकीय अधिकारी, तीन नर्स आणि एका वॉर्ड बॉयचं निलंबन करण्यात आलंय. यातील चौघांना पोलिसांनी अटक केलीय. त्यात विशाखा शिंदे यांचाही समावेश आहे. विशाखा शिंदे यांच्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनानं त्यांचं निलंबन मागे घेतलंय. आता नर्सचं निलंबनही मागे घ्यावं अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केलीय.





















