Medha Patkar :मेधा पाटकर दोषी! 24 वर्षांपूर्वीच्या बदनामीच्या गुन्ह्यामध्ये दिल्ली न्यायालयाचा निकाल
नवी दिल्ली: नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या (Narmada Bachao Andolan) आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने 2001 सालच्या एका प्रकरणात दोषी ठरवलं आहे. दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Delhi Lt Governor VK Saxena) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. व्हीके सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर खोटे आरोप, उपहासात्मक वक्तव्ये आणि बदनामी केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. व्हीके सक्सेना यांनी गुजरातच्या संसाधनांचा परकीय हितसंबंधासाठी वापर केल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता.
सक्सेना यांच्याविरोधात मेधा पाटकर यांनी केलेली वक्तव्ये केवळ बदनामीकारकच नाहीत, तर ती नकारात्मक गोष्टींना चालना देतात असं निरीक्षण दिल्ली न्यायायलाने नोंदवलं आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, मेधा पाटकर यांनी केवळ व्हीके सक्सेना यांची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी चुकीची माहिती देऊन आरोप केले होते, हे नि:संदिग्धपणे सिद्ध झाले आहे.
![Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/67ac29b88d8dc637974984a312edbc2c1737968052381976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Dnyaneshwari Munde Mahadev Munde खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/74e1bc4406b429234a52d5efef7c02a71737967665251976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/2a56c55a918a0e80267bf342343ae3081737965852088976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/1a774d0e0fb3d3ad16f1ab319be380731737960999605976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chhaava Movie : Raj Thackeray भेटीनंतर Laxman Utekar यांचा निर्णय; 'छावा'तील तो सीन डिलीट करणार!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/1cb832b3e5750ca66ca8298bc908708b1737960340209976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)